डोहामाजी वास होता बह
235.
डोहामाजी वास होता बहुत दिवस । आता कासा-वीस काय सांगू ॥१॥
विक्राळ होऊनि आला चक्रपानी । काळिया निर्वाणी ध्यान करी ॥२॥
नको काढू मज उदका बाहेरी । दंडवत करी काळिया तो ॥३॥
नामा ह्मणे ऐसा काढिला विखरी । कीर्ति वानू तरी किती देवा ॥४॥
