एकाच्या कैवारें । कल
531.
एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥
ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरले कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥
भक्ति भावचेनि प्रेमे द्वारपाळ जाहला समें । अद्यापि तिष्ठे नेमे । वचन ते नुल्लुमीं ॥३॥
अंकितपणे तिष्ठत उभा । एका जनार्दनी धन्य शोभा । पुडंलिकाच्या लोभा । युगें अठ्ठावीस ॥४॥
