वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

देतो मोक्ष मुक्ति वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084500 · अभंग क्र. ५३२

532.
देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥
सांवळे रुपडें गोजिरे गोमटे । उभे पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥
वाटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी बाह्म देत असे ॥३॥
एका जनार्दनी देता न सरे मागे । जाहली असतीं युगें अठ्ठावीस ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग