वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अंधालागी जेवी उदेजेल

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076441 · अभंग क्र. २८६

286.
अंधालागी जेवी उदेजेला भानु ।
कोल्हिया चंदनु व्यर्थ जैसा ॥१॥
ज्ञानहीना तेवी आत्मा हा प्रत्यक्ष ।
न ये मना साक्ष मूर्खपणे ॥२॥
चंद्राचा प्रकाश कावळ्यांसी पाहे ।
वानरांसी काये वस्त्रे होती ॥३॥
बहेरियासी काय गीत तानमान ।
श्वानासी मिष्टान्न जयापरी ॥४॥
नपुंसका जेवी पद्मिनी सुंदरा ।
प्राणेविण नरा भोग जैसा ॥५॥
बहेणि म्हणे तैसा सन्मार्ग मूर्खासी ।
बोधिता तयासी सिद्ध नाही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग