जडलेसे चित्त विषयी स
285.
जडलेसे चित्त विषयी सर्वदा ।
नये ब्रह्मबोधा आत्मनिष्ठे ॥१॥
जया पै संचित नाही शुद्ध ज्याचे ।
देह पातकाचे वोतीव ते ॥२॥
अहंकर देही काम क्रोध लोभ ।
आवडे अशुभ कर्म ज्यासी ॥३॥
बहेणि म्हणे श्रेष्ठा न मानी प्रमाण ।
तेचि एक हीन वोळखावे ॥४॥
