पतित पातकी खळ दुराचा
401.
पतित पातकी खळ दुराचारी । पाहता पंढरी मोक्ष तया ॥१॥
स्वमुखं भक्ता सांगतो आपण । नका अनुमान धरु कोणी ॥२॥
चंद्रभागा दृष्टी पाहता नरनारी । मोक्ष त्यांचे घरी मुक्तिसहित ॥३॥
चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती ॥४॥
एका जनार्दनी न घ्यावा संशय । दरुशने जाय पापताप ॥५॥
