निघोनिया देखा आली त्
593.
निघोनिया देखा आली त्या तटाका| जाली एकमेका भेटी तेथे ॥१॥
परस्परे दुःख देखता वाढले| धैर्याचेंचि बळ केले त्यांनी ॥२॥
देहभाव काही नाठवे तयांसी| गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥
नामा म्हणे देवे सोडवावे त्यासी| हे तो अनेकासी आटोपेना ॥४॥
