ऐशा दोघीजणी एकविध भा
592.
ऐशा दोघीजणी एकविध भावें| द्यावयासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥
धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ| सत्वाचेचि बळ अंगामध्ये ॥२॥
जुनिया येई बाळकासी स्तन| आम्ही दोघेजण येथे असो ॥३॥
न टाका मजला सांगोनि निघाली| बिऱ्हाडासी आली लागवेगे |॥४॥
घेवोनिया अंकी पाडसे ती दोन्ही| लावूनिया स्तनी शोक करी ॥५॥
एकमेके सुखे राहावे अनन्य| तुटले सौजन्य तुम्हा आम्हा ॥६॥
पति पाडिलासे फासी सांडितसे प्राण| आम्हा लागी जाणे त्याच्यासंगे ॥७॥
हृदयी धरोनी दिधले चुंबन| ती म्हणती कोण पोशी आम्हा ॥८॥
येऊ तुम्हासंगे देऊ बाधी प्राण| पुढील कारण तुम्ही पाहा ॥९॥
नामा म्हणे ऐसे पांचही ते एक| देखोनि कौतुक वाटतसे ॥१०॥
