पारधी तो झड घालोनी प
594.
पारधी तो झड घालोनी पातला| घालावया घाला एकसरे ॥१॥
भयाभीत जाली पांचही ते काळीं| वासना गुंतली एकमेका ॥२॥
वडील कुरंगी येऊनी त्यापाशी| लागोनी पायांसी काय बोले ॥३॥
नको मारू पति तृषेने पीडिला| मारी तू मजला तया आधी ॥४॥
आहेवपणाने धाडी स्वर्गलोका| येतुल्याने सुखा पात्र होशी ॥५॥
इतुकीया माजी दुसरीही आली| ती म्हणे उगली थांब आता ॥६॥
तृषेने पीडिलो पाजी आधी पाणी| मग जैसे मनी तैसे करी ॥७॥
नामा म्हणे भिल्ल विसरला घात| राहिला निवांत त्यांच्या बोले |॥८॥
