टाळ विणे मृदेंगेसी ।
467.
टाळ विणे मृदेंगेसी ।
येती गजरेंसी मिरवत ॥१॥
छबिने पताका गरुडटके ।
घेउनी हरिखे अवलोकिती ॥२॥
म्हणती जन्म सुफळ झाला ।
आजी देखिला परत्पर ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी ।
लेवूनी अंतरी सुखावती ॥४॥
467.
टाळ विणे मृदेंगेसी ।
येती गजरेंसी मिरवत ॥१॥
छबिने पताका गरुडटके ।
घेउनी हरिखे अवलोकिती ॥२॥
म्हणती जन्म सुफळ झाला ।
आजी देखिला परत्पर ॥३॥
निळा म्हणे विठ्ठल हरी ।
लेवूनी अंतरी सुखावती ॥४॥