धरुनि हाती हात पोरा
236.
धरुनि हाती हात पोरा धरिसी चिकाटी ।
न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥
धरिसी तरी धरि एक हरी चित्ती मनी ।
नाही तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥
सोडविता न सुटे त्या न सिवे आभिमाना ।
वांया व्यर्थ कुंथोनिया पडसिल पतना ॥३॥
निळा म्हणे अंतरीचे जाणे हरि सर्व ।
तया हातिं हात देता देईल तो वैभव ॥४॥
