खेळो कोलकाठी पुढे धा
235.
खेळो कोलकाठी पुढे धावसील वेगे ।
वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तू आंगे ॥१॥
आता खेळ कोलकाठी ।
रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥
राखो जाता दांडे सिवताती आग ।
नावरती तुज तरी वाउगेचि सोंग ॥३॥
निळा म्हणे वस्तादा करि नंदाचा नंदन ।
तोचि देईल विदया तुज करील प्रवीण ॥४॥
