वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वांझेच्या पुत्रासी न

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075992 · अभंग क्र. ४६५

465.
वांझेच्या पुत्रासी नपुंसककन्या ।
दिधली त्यांच्या लग्ना चला जाऊ ॥१॥
तैसी जाण माया सत्य ना असत्य ।
तिचे ते शाश्वत केवी बापा ॥२॥
मृगजळे जेवी तृषा बोळविली ।
जीवे मेल्या भरली तरळ तैसी ॥३॥
बहेणि म्हणे मिथ्या म्हणो नेदी कदा ।
सत्य याचि शब्दा स्तब्ध ठेले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग