वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जयामाजी दीक्षा हारपो

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089987 · अभंग क्र. १०६

106.
जयामाजी दीक्षा हारपोनि जाये । द्वैत हेंही ठाये दुजेपणे ॥१॥
ते रूप रोकडे दिसे चहूंकडे । गोपाळ सवंगडे खेळताती ॥२॥
उपरति योगिया तितिक्षा हारपे । मायाकार लोपे कृष्णध्याने ॥३॥
निवृत्ति तत्पर सर्व हा श्रीधर । मनाचा विचार हारपला ॥४॥

अर्थ:
त्या अद्वैत स्वरुपात द्वैताला द्वैत होण्यासाठी तसुभर जागा नाही.त्याच रुपात मंत्र देणारा गुरु व मंत्र घेणारा शिष्य ह्यांचा लय होऊन ते त्या ब्रह्मस्वरुपात लीन होतात. ते रुप सगुण साकार होऊन गोपाळांबरोबर खेळत आहे. त्याच स्वरुपात योग्यांना वैराग्य ज्ञान व तितिक्षा ह्यांचा लय करता येतो व माया ही त्याच ठिकाणी ब्रह्मरुप पावते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाच्या सर्वत्र प्रगट होण्याने मन त्या श्रीधर रुपात मग्न होते

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग