वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

आदि मध्य अंत सर्वसम

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074398 · अभंग क्र. ६५५

655.
आदि मध्य अंत सर्वसम हरि ।
घटमठचारी भरला दिसे ॥१॥
देखिला गे माये अलक्ष लक्षिता ।
शांति पक्षवाता समबुद्धि ॥२॥
भावबळे घन अलोट अभंग ।
चित्संगे भंग प्रपंचाचा ॥३॥
ज्ञानदेव बोले नित्यनामप्रेम ।
तेथेंचि विश्रामलहरीचा असे ॥४॥

अर्थ :
जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हरिस्वरूपात असल्यामुळे घटमठादि सर्व पदार्थामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे. असे त्या अलक्ष परमात्म्याचे लक्षणाने चिंतन करित असता त्याला मी पाहिला. जसा वायु सर्वत्र व्याप्त असतो. त्याप्रमाणे बुध्दीतील संसाराची बाजु जाऊन शांति प्राप्त झाली. तो अविनाश ज्ञानस्वरूप आत्मा त्याचे ठिकाणी माझा बळकट भाव असल्यामुळे त्याचे संगतीने प्रपंचाचा नाश झाला. नामाविषयी ज्याचे अंतःकरणात नित्य प्रेम आहे. ते अंतःकरणच श्रीहरिच्या विश्रांतीची जागा आहे. त्या अंतःकरणात नित्य श्रीहरि प्रगट असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग