वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

ज्योतीस ज्योति मेळउन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074389 · अभंग क्र. ६५४

654.
ज्योतीस ज्योति मेळउनी हाती ।
तव अवचित्ती झोंबिन्नली ॥१॥
अद्वैत पाहता न दिसे गुणमेळु ।
गुणा गुणी अडळु ठाउका नोहे ॥२॥
शून्याहि परता आदि अंतु नाही ।
तो असोनिया देही धांवो सरे ॥३॥
बापरखुमादेविवरू विसरला धांव ।
हरिरूप भाव दीपकळा ॥४॥

अर्थ :
जीवात्मज्योतीचे परमात्म ज्योतीशी सहजच जीवपरमात्म्याचे ऐक्य होते. अशा अद्वैतसृष्टीचा उदय झाला असता मायेच्या त्रिगुणांत गुणागुणी भाव ठाऊक नसल्यासारखा होतो. शून्याही पलिकडचा आदि अंतरहित तो परमात्मा असून देहामध्येच व्याप्त असल्यासारखा दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हालचालरहित असे एकरूप आहते. ही ज्ञानाची ज्योत श्रीगुरू निवृत्तिरायानी आम्हाला दाखवली असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग