वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

कापुराची सोय कापुरीच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074360 · अभंग क्र. ६५६

656.
कापुराची सोय कापुरीची माय ।
परतोनी धाय ने घे तैसी ॥१॥
असोनी नसणे सर्वत्री दिसणे ।
हरिप्रेम घेणे परे आम्हा ॥२॥
सुखरूप असतांचि शीव ।
हरपले भाव विज्ञानेसी ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु सुखाचा ।
तरंगुही नावांचा परतेचिना ॥४॥

अर्थ :
कापुराचा सुगंध जसा कापुराच्या ठिकाणीच असतो. त्याप्रमाणे परमानंदरूप झालेली अंतःकरणवृत्ति परमानंदस्वरूपाच्या ठिकाणीच असते. पुन्हा परतून सत्यत्वाने संसाराकडे बघत नाही. आत्मस्वरूप सर्व संसारात असून नसल्यासारखे असले तरी भातिरूपाने सर्वत्र दिसत असतेच असा जो श्रीहरि त्या श्रीहरिचे प्रेम आम्ही घेतले म्हणजे पुरे. वस्तुतः जीवशीवरूप म्हणजे परमात्मरूप आहेच असा बोध झाला म्हणजे देवभाव व त्या देवभावाचे नाशक ज्ञान हे दोन्ही मावळतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सुखाचा सागर आहेत. त्यांच्यावर तरंग म्हणजे देहादिभाव पुन्हा उत्पन्न होत नाही. असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग