आपुला तो एक देव करून
10.
आपुला तो एक देव करूनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर ती माइके दुःखाची जनिती । नाही आदि अंती अवसानी ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाचे ॥३॥
तुका म्हणे एका मरणेचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागे ॥४॥
