वैदीण ३९७७
3977.
वैदीण ३९७७
अनादिसिद्ध नवलाई झाले । स्वानंदेंकुरकुला घेऊन शकुन सांगू आले । प्रेमाचेंकुंकू भाळी लाविले । सद्भक्ती बोराठी हातीधरिले ॥१॥ बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल ॥धृ.॥ चार युगांची काखे पोतडी । दशावतार खेळेपरवडी । सोहं शब्द बोलती चोखडी । माझाशकुन ऐके आवडी ॥२॥ मच्छाबाई बुरगुंडाहोईल॥कर्माईबया०॥वहाईबया०॥नरसाईबया०॥वामनाईबया०॥बोधाईबया०॥कलंकाईबया०॥शकुन सांगू आले बुरगुंडा होईल ॥३॥ गंगाईबया०॥भागाईबया०॥यमुनाईबया०॥कृष्णाईबया०॥यमाईबया०॥तुकाईबया०॥लक्ष्मीआईबया०॥मच्छ कच्छ वराह नारसिंह रूपिनी । भक्तालागींस्तंभ फोडुनी । दैत्यांचा अंत करुनी । प्रल्हादकरकुला रक्षिलासे ॥५॥ वामन परशराम रूपिनी । हनमंत कुरकुला सवे घेउनी । शकुन सांगावयालंका भुवनीं । सीतेकारणे गेलीस ॥६॥ कौरवपांडव सर्व मिळाले । शकुन सांगावया तुजपाचारिलें । अर्जुन रथी बैसविलें । शकून कुरकुलाघेउनी ॥७॥ ज्ञानदेव निवृत्ति सोपान । नामदेवादिसंतजन । हे कुरकुले सवे घेऊन । भीमातटी आलीअसे ॥८॥ पुंडलिक कुरकुला पाहून । समचरणविटेवर ठेवून । भक्तालागीं आनुदिन । करकटीराहिलासे ॥९॥ ऐसा शकुन सांगितला । एकाजनार्दनीं आनंद झाला । संती जयजयकार केला।शकुन कुरकुरला ऐकोनी॥१०॥
