वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 239. जोहार ३८६२ ते ३८९८

जोहार मायबाप जोहार ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090426 · अभंग क्र. ३८९७

3897.
जोहार मायबाप जोहार । माझीनकटी बायको गहवार । खावया मागती अंब्याचाखार । आणुनी द्यावा की जी मायबाप ॥१॥ माझीबायको मोठी । तिची संगत पडली खोटी । तिनेधरूनी माझी हनुवटी । म्हणे ऐका की जी मायबाप ॥२॥ माझे एक मूल लहान । त्याचे तुम्ही करापाळण । हे सांगतो वर्तमान । सावधान ऐका कीजी मायबाप ॥३॥ माझी बायको राधाई । तिचेपंचमूर्ती जावांई । म्हणोनी सर्वासी सांगतो पाही । ऐका की जी मायबाप ॥४॥ एका जनार्दनाचामहार । सांगतो वर्तमान फार माझा खोटा नव्हेसमाचार । परब्रह्मीं वास कराल की जीमायबाप ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग