वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

जन्मा आलो त्याचे । आ

🙏 3. संत तुकाराम · ABH-079320 · अभंग क्र. १०१५

1015.
जन्मा आलो त्याचे । आजि फळ जाले साचे ॥१॥
तुम्ही सांभाळिले संती । भय निरसली खंती ॥धृपद॥
कृतकृत्य जालो । इच्छा केली ते पावलो ॥२॥
तुका म्हणे काळ । आता करू न शकेबळ ॥३॥

अर्थ :
आज मी मनुष्य जन्माला आलो त्याचे खरे फळ प्राप्त झाले. ते फळ म्हणजे असे की तुम्ही संत जणांनी माझा सांभाळ केला त्यामुळे माझे जन्ममरणाचे भय व खंत नाहीशी झाली आहे. आतापर्यंत मी जे काही इच्छा व्यक्त केली ती सर्व मला मिळाली माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता काळ माझ्यावर त्याची बळजबरी करू शकत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग