वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

काय वाणू आता न पुरे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078998 · अभंग क्र. १०१४

1014.
काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवो कैसे लोखंडासी ॥धृपद॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारे ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥३॥
तुका म्हणे सुख पराविया सुखे । अमृत हे मुखे स्रवतसे ॥४॥

अर्थ :
आता मी या संतांचे वर्णन तरी कसे करू कारण ऐवढे सामर्थ्य एवढे बळ माझ्या वाणीत नाही मी बाकी काहीही न करता या संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो. परिस आपले मोठेपणा आपली थोरी बाजूला ठेवून तोच लोखंडाचे सोने करतो तो असे म्हणत नाही की मी परिस आहे आणि हे लोखंड आहे मी याला कसा स्पर्श करू. संत ही तसेच आहे ते या जगाच्या कल्याणा करता अवतार घेतात आणि या भूतालातील लोकांवर परोपकार करण्याकरता देह कष्टविता. संतांचे भांडवल म्हणजे तरी काय तर ते या भूतांवर म्हणजे प्राणी मात्रांवर दया करतात व स्वतःच्या देहाविषयी त्यांना मुळीच ममत्व नसते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात आणि त्यांच्या वाणीतून नेहमी नामामृत स्त्रवत असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग