वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

काय पुण्यराशी । गेल्

🙏 3. संत तुकाराम · ABH-078926 · अभंग क्र. १०१६

1016.
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशी ॥१॥
तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥धृपद॥
काय वोळले संचित । ऐसे नेणो अगणित ॥२॥
तुका म्हणे नेणे । काय केले नारायणे ॥३॥

अर्थ :
माझ्या पुण्याचा राशी आकाशाला भेदून गेले की काय हे मला काही कळत नाही. कारण तुम्ही संत जणांनी माझ्यावर कृपा करून करून माझा सांभाळ केला आहे. पूर्व पुण्याची संचित माझ्याकडे कसे ओढले हे मला काही कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या संत जनांची भेट घडवून आणण्याकरता नारायणाने च माझ्यावर कृपा केली आहे की काय हे मला कळत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग