वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

शब्दाचे बोलणे दृश्य

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076431 · अभंग क्र. १०१

101.
शब्दाचे बोलणे दृश्य हे तोवरी ।
अदृश्य हे जाण हरपले ॥१॥
तेथे हा श्रीगुरु बोधील समर्थ ।
दाखवोनी अर्थ श्रुति शास्त्रे ॥२॥
बुद्धीचे बोधक चित्ताचे चिंतन ।
अदृश्य हे जाण हरपले ॥३॥
इंद्रियांचे सर्व आकारी बोलणे ।
निराकारी जाण हरपले ॥४॥
बहेणि म्हणे जेथे अनिर्वाच्य बोली ।
सद्गुरू माऊली तोचि दावी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग