वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

न लागती वेद शास्त्रा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076112 · अभंग क्र. १००

100.
न लागती वेद शास्त्राचे पठण ।
परमार्थाची खूण वेगळिच ॥१॥
सद्गुरुसी जाई शरण सर्वभावे ।
मग तू स्वभावे ब्रह्मरूप ॥२॥
न लगती तपे व्रते अनुष्ठान ।
आत्मत्वाची खूण वेगळीच ॥३॥
न लगती देव तीर्थ क्षेत्र यात्रा ।
आगमीच्या मंत्रा धांडोळावे ॥४॥
न लगती योग याग प्राणायाम ।
साधनाचे वर्म वेगळेचि ॥५॥
नलगे ब्रह्मचर्य गृहस्थ संन्यास ।
व्रताचे हव्यास व्यर्थ तेही ॥६॥
न लगती पंचाग्नी धूम्राचे प्राशन ।
आकाश-वसन नलगे काही ॥७॥
बहेणि म्हणे एक श्री गुरूवाचोनी ।
मोक्ष तो गहनी प्राप्त नव्हे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग