वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पाचाचे उसने घेऊनी शर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076134 · अभंग क्र. १०२

102.
पाचाचे उसने घेऊनी शरीर ।
आलासी ते सार ब्रह्म साधी ॥१॥
कासया काबाड वाहतोसी ओझे ।
लटिके ते तुझे नोव्हे रया ॥२॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम ।
ज्याचे त्यासी वर्म समर्पावे ॥३॥
लाळ मुत्र स्वेद शुक्र हे शोणित ।
आपाचे हे सत्य गुण पाच ॥४॥
क्षुधा तृषा निद्रा आळस मैथुन ।
तेजाचे गुण जाण पाच ॥५॥
धवन वळण निरोध आकोचन ।
पाच गुण जाण वायूचे ॥६॥
राग द्वेष भय लज्जा आणि मोह ।
पाच गुण होय आकाशाचे ॥७॥
ऐसे हे पंचवीस पाचाचे जाणून ।
ब्रह्मप्राप्ति जाण साधी पा रे ॥८॥
ऐसे हे शरीर घेऊनी आलासी ।
साधी आत्मयासी येथे बापा ॥९॥
बहेणि म्हणे नको भुलो त्या अनित्या ।
वोळखोनी सत्या रापे पा रे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग