वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

आवडीनें नाम वदा की र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087726 · अभंग क्र. ८२४

824.
आवडीनें नाम वदा की रे राम । नासे भवभ्रम क्षणमात्रे ॥१॥
सोपे हे साधन कलयुगा माझारी । नामे पैठा हरी धरें होय ॥२॥
नाम मुखी गाता कीर्तनी नाचता । तुटे भवव्यथा अनेक जन्म ॥३॥
एका जनार्दनी सारांचे पै सार । तुटे येरझार नाना योनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग