वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निजतेज बीज नाठवे हा

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090172 · अभंग क्र. २००

200.
निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥१॥
काय करू कैसे कोठे गेला हरि । देही देहमापारी हरि जाला ॥२॥
विदेह पै गंगा पारुषली चित्ती । चिद्रूपी पै वृत्ति बुडोनि ठेली ॥३॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिले सम्यक्‍ समरसे ॥४॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा । समाधि सोहळा विष्णुरूप ॥५॥
ज्ञानगाये हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥६॥

अर्थ:
आत्मारामाचे निजतेजाचे बीज देहात रुजले की मोह संदेह हरपून जातात. काय करु हा हरि कोठे गेला म्हणुन शोध सुरु केला तर तो हरि ह्या देहात देह म्हणुन सापडला. विदेही अवस्थेतील गंगा आत्मारामरुपी चित्त सागराला मिळाली व त्या एकत्वाच्या ठिकाणी सर्व वृत्ती तदाकार होऊन त्या गंगासागरात बुडाल्या. श्री गुरु गहिनीनाथ तलाव असुन मी त्या तलावाचा तट असुन तो तट व तलाव सम्यक दिसले की तलाव पूर्ण होऊन साकार होतो. चित्त, वृत्ती, धृती, यज्ञ दान ह्या कलानी समाधीस्थ होऊन त्या विष्णुरुपाशी एकरुप होता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सतत त्याचे नाम ज्ञान पुर्वक गायन केल्यामुळे तो हरि वृत्ती रहित होऊन माझ्यात संपुर्ण भरुन राहिला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग