श्यामाची श्याम सेजवर
201.
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्गुरुरे ॥१॥
सद्गुरुवीण मूढासि दरुशन कैचे । ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥२॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावे भूमीभारु ॥३॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वे दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥४॥
अर्थ:
त्या परब्रम्हाला कोणी निळ्यारंगाचा मानते तर कोणी काळ्या रंगाचा मानते. कारण देहाचा रंग ही काळा आहे. काळ्या रंगांच्या देहाने निळ्या रंगाशी तद्रुपता पावता येते. तसेच जो परब्रम्हांशी तद्रुपता करुन देतो त्याला सद्गुरु म्हणतात. त्या देहरुपी जीवास परब्रह्माचे दर्शन फक्त सद्गुरूच करुन देतात हे आश्चर्यच आहे. साधकाच्या भावानुसार मंत्र न देता वेगळाच मंत्र देणारे गुरु हे भूमीला भारच असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, गुरुनी दाखवलेले तत्त्वज्ञान साक्षत्व दाखवते तेच एक आश्चर्य आहे.
