द्वैताचीये प्रभे नसो
199.
द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपे ॥१॥
ते हे सांवळे स्वरूप डोळस । बाळरूप मीस घेतलेसे ॥२॥
तिही लोकी दुर्लभ न कळे जीवशिवी । तो आपणचि लाघवी मावरूपे ॥३॥
निवृत्तीचे सार जीवशिवबिढार । गुरूने निर्धार सांगितला ॥४॥
अर्थ:
द्वैताच्या प्रभावातही ही तो निर्गुण परमात्मा भासमान होऊन उरला आहे. व निराकार असुन ही सर्व जगताच्या रुपातुन व्यापुन राहिला आहे. त्या निर्गुण रुपाने श्रीकृष्ण रुपी सगुण बालकत्व घेऊन अवतार घेतला आहे. तिन्ही लोक व जीव शिवाला न कळणारा परमात्मा आपल्या मायारुपाने सगुण लाघवी बाल स्वरुपात आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जीव शिव चे सार ओझे खांद्यावर घेऊन मार्ग चालावा असे श्री गुरु गहिनी निश्चयात्मक सांगतात.
