वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

निर्गुण निराकारे आदि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090485 · अभंग क्र. ३९२४

3924.
निर्गुण निराकारे आदिमाते मुळाधारेवो । अलक्ष सर्वेश्वरी चिदानंद अपरंपार वो । ब्रह्मतेजाकार महाकारण अकार वो । अंबऋषी कैवारेनाम संसाराचे तारु वो ॥१॥ उदो बोला उदो उदोवैष्णवी माऊलीचा वो ॥धृ.॥ शिवेवर दिधला आसुरशंकासुर मातला वो । चतुरानन गांजिला वेद चारीघेउनी गेला वो । सुरपती त्रासिला तो तुजलाशरणआला वो । तो त्वा सिध्दी नेला मीनरुपी वध केलावो ॥२॥ उदो, म्हणा उदो मच्छाई माऊलीचा वो ॥धृ.॥ सुरासुराचे काळी अवनी अहंकारे दाटली वो । शेषे पृथ्वी धरली तंव ती पाताळी चालली वो । ऐसे त्वा देखता अंबे तुज करुणा आली वो । तै त्वांकच्छरु पृथ्वी पृष्ठी वरी वाहाली वो॥३॥उदोम्हणा उदो कुर्माई माऊलीचा वो ॥धृ.॥ असुर कुळीमागुती मिळोनी केला अवनी भार वो । मगर कुर्मलागले जाणोनिघेसी तुं कैवार वो । अभिनव लीलातुही केला सकळांचा संहार वो । तै त्वा सुकर रूपेंदाढा लावुनि दिधला धीर वो ॥४॥उदो म्हणा उदोव-हाई माऊलीचा वो ॥धृ.॥ असुर कुळी जन्मलाभक्त प्रल्हाद बोधिला वो । छंद तुझालागला देखोनिपितयाने गाजीला वो । नामी निर्भर झाला । ते त्वांस्तंभी उद्भव केला वो । दैत्य जानुवरी हिरण्यकश्पुविदारीला वो॥५॥उदो म्हणा उदो नरसाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ भेदोनी सुरनर लोक असुरगर्वी झाला बळीं वो । सुरपती शरण आला म्हणेराहे महितळी वो । तै त्वा वामन रुपे पृथ्वी तीन पदेव्यापीली वो । त्रिविक्रमाच्या रूपे त्वा बळी दडपीलेपाताळी वो॥६॥ उदो म्हणा उदो वामनाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ भृगुऋषींचे कुळी मातेंरेणुकेचेउदरीं वो । अवतार घेतला परशुराम तुं सुंदरी वो । सहस्त्रार्जुन मारीला तो मातेच्या कैवारी वो । पृथ्वीएकवीस वेळा फिरुनी नि:क्षत्रिय संहारी वो ॥७॥ उदोम्हणा उदो परसाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ पहांतापरात्पर पुर्ण रामाई अवतार वो । वनवसाच्या मिषेकेला दूष्टांचा संहार वो । भानुकुळी नांदसी नामेसंसाराचे तारु वो । वधोनिया दशकंठ राज्यींस्थापिलें किंकरु वो ॥८॥ उदो म्हणा उदो रामाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ नंद यशोदें घरी गोंधळगोकुळामाझारीवो । अनंत लिलाखेळसीतुंकान्हाई । सुंदरी वो । बाळपणी मारीला मामा कंसासुर वैरी वो । पांडव करुनी पुढे भार पृथ्वीचा उतरविला वो ॥९॥ उदोम्हणा उदो कृष्णाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ ।बोधोनि सकळही लोका बोधे । नेले त्रिविधताप वो । बौद्धरुपेनांदसी बोलेविना बोलणे एक वो । साधकबाधक जेथे एकपणेची अनेक वो । बौध्दे अवतार । तुझ्या बोधाविण बोधविसी वो ॥१०॥ उदो म्हणा । उदो बौधाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ नामकलंकी मातावेदा दावी साक्षेपता वो । भिन्नपणे भाविताभिन्नभिन्नचढे हातांवो । व्यापक जे भावीती मजमाजीची तत्वता वो । कुटीलपणे खेळसी भुलीघालुनी फिरवीमज चित्ता वो ॥११॥ उदो म्हणा उदोकलंकाईमाऊलीचा वो ॥धृ.॥ एकचि माऊली दहाअवतार खेळली वो । पहातांगुरुवचनीं मज माजीचबिंबली वो । हरुनी त्रिविध ताप साधुजनांला उध्दरीवो । एका जनार्दनी सहजीं सहजें ऐक्या आली वो । उदो म्हणा उदो दशविध माऊलीचा वो ॥धृ.॥ ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग