वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

अष्टधातुचे देवालय रच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090484 · अभंग क्र. ३९२५

3925.
अष्टधातुचे देवालय रचिंले वो । दिव्यतगट नवविधरत्नें जडविले वो । चित्रविचित्र सुचित्रशोभा ते आणिले वो । रंगमंडप पीठी तु जलागींस्थापिलें वो ॥१॥ पंढरपुरनिवासीनी तुझा गोंधळमांडीला वो । सारुनी कामक्रोधा वैराग्य दिवटाघेतिला वो ॥धृ.॥ हरिजन सर्व मिळोनी आनंदेनाचती वो । भावे पुजन अर्चन सद्भावे करिती वो । धुपदिप नैवेद्य चतुर्विध अर्पिती वो । समर्पोनि पुजाविठ्ठलनामें गर्जती वो ॥२॥ भीवरे माझारी गोंधळमांडीला वो । पुंडलिक दिवटा मध्यभागी स्थापिलावो । जेणे पाहिले पंढरपुर नरुचे आणिक क्षेत्र त्याला , वो । एका जनार्दनी ऐसा ठावो स्थिर धरियेलावो॥ध्रु.॥॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग