वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

न कळे जयांचे महिमान

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084391 · अभंग क्र. ६२९

629.
न कळे जयांचे महिमान । वेदश्रुतीसी पंडिले मौन ।
वेडावले दरुशन । जयालागीं पाहता ॥१॥
तोचि उभा विटेवरी । भक्त करुणाकर ।
हरी रुक्मीणी निर्धारी । वामभागी शोभती ॥२॥
गरुड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा ।
नभी लोपली तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ॥३॥
मन ध्याता न धाये । दृष्टी पाहता न समाये ।
एका जनार्दनी पाय । वंदु त्याचे आवडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग