हरिभक्त माझे जिवलग स
1406.
हरिभक्त माझे जिवलग सांगाती ।
सांभाळूनी नेती परलोका ॥१॥
वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ ।
करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥
मोहादिबंधने जाती तुटोनिया ।
कळिकाळहि पायातळी दडे ॥३॥
निळा म्हणे मुक्त मोकळिया वाटा ।
जावया वैकुंठा त्यांच्या संगे ॥४॥
