वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 130. रामरावणाची एकरुपता - अभंग ३४८२ ते ३४८३

रामरावणाची एकरुपता -

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085527 · अभंग क्र. ३४८२

3482.
रामरावणाची एकरुपता - अभंग ३४८२ ते ३४८३

रावण म्हणे नवल चोज । माझे कटक पारखे मज । अश्व आणि नर गज । रामजी स्वये ॥१॥
निशाचर वीर । राम बाणले साचार । रामरुप वानर । सरसावले ॥२॥
युध्दीं ठक पडिले लंकानाथा । जीऊचि पारिखा आता । इंद्रियांची सत्ता । रामरुप जाली ॥३॥
शस्त्रांचें तिखटपण । राम जाला आपण । शत्रुमित्र संपूर्ण । राम स्वये ॥४॥
युध्दी पारखे अंत:करण । मन जाले उन्मन । अहं ते सोहं जाण । होउनी ठेले ॥५॥
चित्त जाले चैतन्य । बुध्दि ते समाधी धन । देह तो विदेह पूर्ण । राम जाला ॥६॥
राम पारखें केले लंकागड । दृढ राम जाला दुर्ग आगड । न झुंजतां अवघड । घेतला रामे ॥७॥
रामे घेतलें घर । राम जाला कलत्रपुत्र । अवयव अलंकार । राम झाला ॥८॥
मी म्हणे हा अवघड गड । तंव राम जाला गडीचे दगड । महामार अति गूढ । राम जाला ॥९॥
आता कायसी निज देह निकुंभिला । येथे कोण मानी मोह कुंभकर्णाचे बळ । बळाच्या सबळ बळा । राम जाला ॥१०॥
एका जनार्दनी निजभावें युध्द पूर्ण । रावणचि आपण राम जाला ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग