रामे रावण रणी । निवट
3483.
रामे रावण रणी । निवटिला निजबोध वाणी । येर सर्वस्व मानुनी । निज सुखी जाहला ॥१॥
दहा मुखांते छेदिलें । शेखी विश्वमुखें केले । रणी रामे सुख दिधले । परम सुख ॥२॥
राम तो वैरी नव्हे राजा । सखा जिवलग माझा । दहा मुखें वीस भुजा । फ़ेडिला केरु ॥३॥
नश्वरा राज्य नेलें । रावणपण गेले । अक्षयी राज्य दिधले । श्रीरघुनाथें ॥४॥
माझे देह संदेह छेदिलें । ली वेदामृत पाजिलें । ऐसे बोलता बोले । बोलवेना ॥५॥
राम रावण रणी । बोधाची झोट धरणी । एका जनार्दनी । मिनले एकपणीं ॥६॥
