करुनि उचित । प्रेम घ
3988.
करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥
आलो दान मागायास । थोर करूनिया आस ॥धृपद॥
चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥२॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥३॥
अर्थ :
देवा माझ्या ह्दयामध्ये तुझ्याविषयीचे उचित असे प्रेम निर्माण होऊन तेच तुम्ही माझ्या हृदयामध्ये घालावे. आणि याचसंबंधी मी मोठी अपेक्षा धरुन तुला दान मागण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. देवा मी ज्यावेळी तुमचे चिंतन करेल त्यावेळी मला तुझीच सेवा घडावी. तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा म्हणतात की, देवा माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी भक्तिभाव उत्पन्न करावा आणि त्याच भक्तिभावाच्या स्वाधीन मला करावे.
