वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

तूच मायबाप बंधु सखा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079712 · अभंग क्र. ३९८७

3987.
तूच मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥
आणीक प्रमाण नाही दुसरे आता । योगक्षेमभार तुझे घातला माथा ॥धृपद॥
तूंच क्रियाकर्म धर्म देव तू कुळ । तूंच तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥
म्हणे तुकयाबंधु कर्ता कारयिता देवा । तूंच भाव भक्ति पूजा पुरस्कार आघवा ॥३॥

अर्थ :
देवा तूच आमचा माय, बाप, बंधू, सखा आणि आमचा वित्त, गोत, जीवाचा जिवलग देखील तूच आहेस. देवा मी माझ्या योगक्षेमाचा भार तुझ्या माथ्यावर घातला आहे आणि तुझ्यावाचून मला दुसरे कोणीही प्रमाण नाही. देवा तूच आमच्यासाठी क्रिया, कर्म, धर्म व कुळ आहेस आणि तूच आमच्यासाठी तप, तीर्थ, व्रत, गुरु सर्वकाही आहेस. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, देवा तूच कर्ता करविता आहेस आणि तूच भावभक्तिपूजा सर्व पुरस्कार देखील आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग