गाऊ वाहु टाळी रंगी न
3989.
गाऊ वाहु टाळी रंगी नाचो उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥
बळियांचा बळी वो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळा ही सिद्धींचा ॥धृपद॥
मारू शब्दशस्त्रे बाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडू काळाचे ॥२॥
म्हणे तुकयाबंधु नाही जीवाची चाड । आपुलिया तेथे काय आणिकाची भीड ॥३॥
अर्थ :
हरीचे नाम आम्ही गाऊ व त्याच्या छंदामध्येच आम्ही टाळी वाजवून त्याच्याच रंगात देहाविषयी उदास होऊन नाचू त्याचे नाम गाताना सर्व प्रकारचे भय, लज्जा, शंका, अपेक्षा व निराशा आम्ही टाकून देऊ. सर्वामध्ये बलवान असलेल्या बलवंत हरीचे आम्ही दास असून तोच आमचा कैवारी आहे आणि भुक्ती, मुक्तीचा तो दाता असून सर्व सिध्दींचा तो स्वामी आहे. आता आम्ही शब्द, शस्त्रांचे बाण चालू आणि नि:शंक होऊ कंटक अशा कळीकाळाचे शीर आम्ही फोडून त्याचा नाश करु. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात की, आम्हाला आता आमच्याच जीवाची आवड राहिली नाही मग आम्ही इतरांची भीड काय धरणार आहोत. ?
