वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

स्वानंदांत पडोनिया ज

🙏 4. संत नामदेव · ABH-082360 · अभंग क्र. १४०५

1405.
स्वानंदांत पडोनिया जाती | न संडी वासना चघळत हस्ती ॥१॥
तैसे माझे मन मुरारी | वासना धांवे विषयावरी ॥२॥
डोळियांची बुबुळे फुटोनिया जाती | न रांठी वासना हालवितो पाती ॥३॥
ढोराचे पुच्छ मोडोनिया चांगा | पुढती पुढती हालविती मे गा ॥४॥
बोढाळ ढोरा बांधियेले काष्ट | पुढती पुढती धरी तीच वाट ॥५॥
नामा म्हणे माझी मुळी वासनाच खोटी खेचर विसा चरणी घातलिसे मिठी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग