भक्ति हेंचि भाग परब्
1404.
भक्ति हेंचि भाग परब्रह्म पक्वान्न | गुरुमुखे जेवण जेवियेले ॥१॥
अनुभव भात लयलक्ष कढी | जेवणार गोडी घेत असे ॥२॥
सुखशांति शाखा भावार्थ हा वडा | जेवणार गाढा आत्माराम ॥३॥
दया क्षीरधारी शांती पूर्णपोळी | घृत है कल्होळी प्रेम माझे ॥४॥
विषयाचा गुरला थुंकोनी सांडिला | नामा आंचवला संसारासी ॥५॥
