उदयी उदय होता कृपादृ
7.
उदयी उदय होता कृपादृष्टी ।
स्वये जगजेठी सेवा करी ॥१॥
सडा समार्जन स्वये करी हरि ।
उदक ते भरी गंध घासी ॥२॥
स्वार्थ परमार्थ दोन्ही ही साधन ।
साधियेले जाण क्षणमात्रे ॥३॥
करोनि कवित्व एकादशी टीका ।
भागवत देखा हरिलीला ॥४॥
निळा म्हणे अपार करोनि अभंग ।
तोडीला उव्देग संसाराचा ॥५॥
