वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 10. विठ्ठल नामाची सुलभता

विठ्ठल नामाची सुलभता

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073760 · अभंग क्र. १०

१०.विठ्ठल नामाची सुलभता

३३.
नलगे योग तप । करणे साटोप आम्हांसी ॥१॥
सोपें साधन आमुचे । नाम गाऊ विठोबाचे ॥२॥
जो नातुडे धूम्रपानीं । राहे संपुष्टि येऊनि ॥३॥
जया नाही रूप । आम्हा कीर्तनी समीप ॥४॥
सेना म्हणे लडिवाळ । जाणो हरीसी निर्मळ ॥५॥

३४.
म्हणा हरी हरी । अवघे सकळ नरनारी ॥१॥
येणे तुटेल बंधन । भाग निवारील शीण ॥२॥
प्रेमे घ्यारे मुखी नाम । हरे सकळही श्रम ॥३॥
सेना म्हणे चित्तीं धरा । बळकट रखुमाईच्या वरा ॥४॥

३५.
कशासाठी करिता खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ॥१॥
नलगे शोधावे गिरिकानन । भावे रिघा विठ्ठला शरण ॥२॥
विभांडक श्रृंगी तपस्वी आगळा । क्षण न लागत रंभेनें नागविला ॥३॥
जाणोनि सेना निवांत बैसला । केशवराजा शरण रिघाला ॥४॥

३६.
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलता नोहे वाचे । शांतवन क्रोधाचें झालें नाही ॥१॥
पाल्हाळ लटिका करणे तो काय । शरण पंढरीराया गेला नाही ॥२॥
जंव नाही गेली अज्ञानाची भ्रांती । जंव नाही विरक्ती बाणली आंगी ॥३॥
जीवाची तळमळ राहिली सकळ । मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ॥४॥

३७.
घरासी आले संत देखोनिया । म्हणे यासी खावया कोठुनी घालू ॥१॥
ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी । जन्मोनियां झाला भूमि भारी ॥२॥
दासीचें आर्जव करोनि भोजन । घाली समाधान करी तीचें ॥३॥
आणि आवडीनें करी तिची सेवा । म्हणे सुख जीवा फार माझ्या ॥४॥
संतानीं पाणी मागता म्हणे काय । मोडले की पाय जाय आणि ॥५॥
सेनां म्हणे कारे गाढवा नेणसी । कुंभपाक वस्तीसि केला आहे ॥६॥

३८.
येऊनि गर्भासी मेलो उपवासी । नाही सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥
देह जाणे अनित्य करावे स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥
न होय अनारिसा पाळी तोंडिच्या घासा । सोडवी ना ऐसी परी देखो ॥३॥
वाटलो मीपणें धनमान कांहीं । सेना म्हणे नाही लाभ अलाभ ॥४॥

३९.
तुज ऐसे वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥
मग नाही नाम निजल्य जागा राम । जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥
दासीगमनीं धीट विषयी लंपट । जावया वाट अधोगती ॥३॥
नर्का जावयासी धरसील चाड । तरी निंदा गोड वैष्णवांची ॥४॥
सेना म्हणे नामाचे लावी करि पिसे । जन्माल्या सायासें व्यर्थ जासी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग