वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 7. संत स्तुती

वैष्णव तो एक इतर ती

🙏 16. संत जनाबाई · ABH-073900 · अभंग क्र. १७३

173.
वैष्णव तो एक इतर ती सोंगे । ठसे देउनी अंगे चितारिती ॥1॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडू लागला । तीर्थरुप केला देशधडी ॥2॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥3॥
विद्येच्या अभिमाने नाइके कीर्तन । पाखांडी हे म्हणे करिती काई ॥4॥
पंचरस पात्रा कांता हे बडविती । उद्धरलो ह्मणती आह्मी संत ॥5॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ । तयाचा विटाळ मातंगीसी ॥6॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार । जनी म्हणे निर्धार केला संती ॥7॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग