वैष्णव तो कबीर चोखाम
172.
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥1॥
सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥2॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी । जिही देवद्वारी वस्ति केली ॥3॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥4॥
त्या वैष्णवाचरणी करी ओंवाळणी । तेथे दासी जनी शरीराची ॥5॥
