कुंतीचे अक्रूराशी भा
210.
कुंतीचे अक्रूराशी भाषण
देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की ॥१॥
पाहोनी तुज झाले समाधान । सुखी आहे कृष्ण मथुरेंत ॥२॥
आमुची एक कुंती आहे हस्तनापुरी । स्मरे तो अं-तरी किंवा नाही ॥३॥
बहुता दिवसा तुज धाडिले आक्रूरा । ह्मणोनि अंतरा सुख वाटे ॥४॥
माझिया बाळासी फार देती दु:ख । नाही मज सुख क्षणभरी ॥५॥
राजा पंडु आम्हा टाकूनिया गेला । रक्षी बाळकाला कोण आता ॥६॥
नामा म्हणे ऐसे सांगतसे कुंती । शिंपियेली क्षिती आश्रुपाते ॥७॥
