वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 36. हमामा - अभंग २०६ ते २१२

कान्होबा खेळ खेळू रा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085098 · अभंग क्र. २१२

212.
कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्ही आम्ही दोघे मिळोनी ॥१॥
हमामा रे भाई हमामा ॥धृ.॥
हमामा घाली मत्स्य अवतारी । शंखासुरा धरुनी मारी ॥२॥
हमामा घाली समुद्रतीरी । धरुनी पर्वत पाठीवरी ॥३॥
हमामा घाली नानापरी । पृथ्वी धरुनी दाढेवरी ॥४॥
हमामा घाली हिरण्य कश्यपाघरीं । प्रगटुनी स्तंभामाझारीं ॥५॥
हमामा घाली बळीचे द्वारी । आपण होऊनि भिकारी ॥६॥
हमामा घाली परशु हाती । निःक्षात्री पृथ्वी केली जगती ॥७॥
हमामा घाली लंकेवर । केला बिभीषण राज्यधर ॥८॥
हमामा घाली नंदाघरीम । गोपाळ नाचती गजरीं ॥९॥
हमामा घाली भीमातटीं । उभाचि धरुनि कर कटी ॥१०॥
एका जनार्दनी खेळ । नानापरीचा आकळ ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग