ज्याचा भाव झाला । दु
23.
ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥१॥
अवघी साधने हातवटी । मोले मिळत नाही हाटी ॥२॥
अहो आपण तैसे व्हावे । अवघे अनुमानूनि घ्यावे ॥३॥
ऐसे केले सद्गुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ॥४॥
तेथे कोणी शिकवावे । सार साधूनिया घ्यावे ॥५॥
लडिवाळ मुक्ताबाई । बीज मुद्यल ठायींचे ठायी ॥६॥
तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥
ताटीचे अभंग समाप्त
