गिरी गव्हारे कशासाठी
22.
गिरी गव्हारे कशासाठी । रागे पुरविली पाठी ॥१॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो का द्वेषी ॥२॥
घर बांधिले डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ॥३॥
काय केला योग धर्म । नाही अंतरी निष्काम ॥४॥
गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
