श्रीबीज संयुक्त पांड
537.
श्रीबीज संयुक्त पांडुरंग-मंत्र ।
जपता पवित्र महापापी ॥१॥
नाही या संदेह पहा वेदशास्त्र ।
गुह्य हे सर्वत्र सांगितले ॥२॥
पाठिमोरा देव होईल सन्मुख ।
अंतरीचे दुःख निवारील ॥३॥
दुर्हवला मोक्ष येईल जवळी ।
फिटेल काजळी मानसाची ॥४॥
पापाचे पर्वत क्शणे होती दग्ध ।
ज्ञानाचा उद्बोध होय चित्ती ॥५॥
बहेणि म्हणे नका पाहू रिद्धिसिद्धीसी ।
जपे जो तयासी फळे आधी ॥६॥
